Eknath Shinde Group Leader Sheetal Mhatre criticize shivsena Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Political News: मान डोलावणारे नंदीबैल आम्ही तुमच्याकडेच सोडून आलोय; शीतल म्हात्रेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Satish Daud

Sheetal Mhatre criticize Uddhav Thackeray

नंदीबैलालाही कुणी विचारलं की, भाजपचे सरकार येणार का? तर तोही सांगेल नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. खोक्याने सरकार आणू शकता, पण संस्कार नाही, असा घणाघातही ठाकरेंनी केला. दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

नंदीबैलांना विचारुन राजकारण करण्याची आमची रीत नाही. आमच्या मनगटात ताकद आहे आणि सोबत बाळासाहेबांचा विचार आहेत. काहीही म्हटलं तर त्याला मान डोलावणारे नंदीबैल आम्ही तुमच्याकडेच सोडून आलो आहोत, असा टोला शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

त्याचबरोबर आमच्याकडे आता आलेल्यांना शिंगावर घेणारे सच्चे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांची दिलदारपणाची, मैत्री निभावण्याची आणि मनात असेल ते स्पष्ट सांगून टाकण्याची परंपरा या पुत्रप्रेमाने अंधत्व आलेल्या उद्ध्वस्त सेनेच्या धृतराष्ट्राने कधीच मोडीत काढली आहे. आता यांची संस्कृती आहे ती आतल्या गाठीची!!! पोटात एक आणि ओठात एक ठेवायची!! अशी टीकाही शीतल म्हात्रे यांनी केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि परंपरांचे जतन करणाऱ्या विविध प्रवर्गातील बांधवांनी मंगळवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी नंदीबैलही सोबत आणले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतानाच, आमच्यावर होणारा अन्याय दूर करा असे गाऱ्हाणेही या प्रवर्गातील बांधवांनी मांडले.

Sheetal Mhatre criticize Uddhav Thackeray

आमची मुलेबाळे सुशिक्षित असूनही अद्याप नोकऱ्यांसाठी भटकत आहेत, आम्हाला आरक्षण नाही, सरकारने आमच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे, अशा व्यथाही त्यांनी मांडल्या. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे स्वागत करतानाच त्यांना मार्गदर्शन केले. बऱ्याच दिवसांनंतर आपल्याला वासुदेव, गोंधळी, नंदीबैल दिसला असे सांगत त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

इतकंच नाही, तर ठाकरेंनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार निशाणा देखील साधला. पूर्वीच्या इच्छापूर्तीसाठी नंदीबैलाकडे मागणे घातले जायचे. आता जर नंदीबैलाला कोणी विचारले की, भाजपचे सरकार येणार का? तर तोही सांगेल नाही, असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

SCROLL FOR NEXT