Maharashtra Political Crisis Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

२४ तासांमध्ये शिंदे गट 'मविआ' सरकारचा पाठिंबा काढणार, राज्यपालांना पत्र पाठविण्याची शक्यता

भाजपने आपल्या सर्व आमदारांना परवा मुंबईत येण्याच्या दिल्या सुचना.

Jagdish Patil

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आज सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. बंडखोर आमदारांचे निलंबन सध्या तरी होणार नसून, याबाबतची सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. शिवाय बंडखोर आमदारांवर तोपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे बंडखोरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या राजकीय हालचालींना आजच्या निकालानंतर वेग आला आहे. शिंदे गटाने आज महत्त्वाची बैठक घेतली असून या बैठकीमध्ये येत्या २४ तासांमध्ये महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याबाबतचे पत्र ते राज्यपालांना पाठविणार असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेते मुंबईला येणार असल्याची माहिती देखील समोर येत असून राज्यपालांची भेट घेऊन ते फ्लोर टेस्टची मागणी करणार असल्याचंही समजतं आहे. एकीकडे शिंदे गटाची बैठक झाल्याचं समोर येत असतानाच, भाजपने (BJP) देखील आपल्या सर्व आमदारांना दोन दिवसांमध्ये मुंबईत येण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीचे नेते ते टीकणार की भाजप आणि बंडखोर मिळून ते पाडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

SCROLL FOR NEXT