chitra wagh Saam tv
मुंबई/पुणे

Governor Appointed MLC : चित्रा वाघ विधानपरिषदेवर, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार? कोणाकोणाला मिळाली संधी? VIDEO

Governor Appointed MLC update : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १२ आमदारांपैकी ७ नावे तयार झाले आहेत.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आचारसंहित लागू होण्याआधी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी ७ जणांचे नावे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीकडून उद्या १२ पैकी ७ राज्यपाल नियुक्त आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप ३, शिवसेना २, राष्ट्रवादी अजित पवार गट २ असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इंद्रिस नाईकवाडी यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याचं बोललं जात आहे. तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबू सिंग राठोड यांची नावे पाठवण्यात आली आहेत. राठोड हे बंजारा समाजाचे धर्मगुरू आहेत. या आमदारांचा उद्या तीन वाजता शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

Murmura Chikki Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिक्की, हिवाळ्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Maharashtra politics : शिवसेना आमदार अजित पवारांवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?

SCROLL FOR NEXT