shinde-Fadnavis Cabinet Expansion saam tv
मुंबई/पुणे

Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर? भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली!

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे.

Satish Daud

Eknath Shinde Devendra Fandanavis Cabinet Expansion : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी राष्ट्रीय नेतृत्वाकडून अद्याप ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने विस्तार लांबणीवर पडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. (Maharashtra Political News)

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होत आहे. त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार सांगत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढून शिंदे गटाला बहाल केल्यापासून तर शिंदे गटात उत्साह संचारला आहे. (Latest Marathi News)

मात्र, असं असलं तरी राज्याच्या भाजपकडून (BJP) विस्तारासाठी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याचं लक्षात येताच, भावी मंत्र्यांचं टेन्शन वाढलं आहे.

राज्य मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशिवाय त्यांच्या गटाचे फक्त ९ मंत्री आहेत. प्रत्यक्षात शिंदेसोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आले आहेत. त्यातील अनेकांना मंत्रिपदाचे आश्वासन दिलेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटातील आठ-दहा नव्हे तर तब्बल ३२ जण मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत.

त्यातील किमान १४ जण मंत्रिपदावर पक्का दावा सांगतात. अपक्षांनाही स्थान द्यावे लागेल. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे मंत्री होते (उदाहरणार्थ बच्चू कडू) अशा नेत्यांनाही मंत्रिपद द्यावे लागेल. ही सर्व स्थिती पाहता मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता दाट दिसते. मात्र या विस्ताराची कोणतीही निर्णयसूत्रे महाराष्ट्रात कुणाकडेही नाहीत. या संदर्भातील निर्णय दिल्लीतच होईल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

SCROLL FOR NEXT