Uddhav Thackeray vs Eknath Shinde Latest News  SAAM TV
मुंबई/पुणे

Shivsena Vs Eknath Shinde | खरी शिवसेना नेमकी कोणाची? CM एकनाथ शिंदेंच्या ट्विटने पुन्हा चर्चेला उधाण

मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केला आहे.

Nandkumar Joshi

Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde मुंबई: खरी शिवसेना कुणाची? यावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना आमचीच असा दावा करणारे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? अशी जोरदार चर्चा पुन्हा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. आता शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन महिना उलटून गेला आहे. मात्र, खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न अद्याप कायम आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून आपापल्या बाजूने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाकडून ते स्वतः आणि त्यांच्या गटातील नेते राज्यभर दौरे काढत आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या.

या निवडणुकांमध्ये अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता आली. एकनाथ शिंदे यांनी आज ट्विट करून राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजप युती सरकारला जनतेचा कौल मिळाल्याचे ट्विट केले. मात्र, हे ट्विट करताना त्यांनी पोस्टमध्ये सोबत जोडलेल्या ग्राफिक्स पोस्टमध्ये उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा त्यांनी या ट्विटद्वारे केल्याचे बोलले जात आहे. सध्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजप युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. शिवसेना - भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार, असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या ग्राफिक्समध्ये पक्षनिहाय ग्रामपंचायत निकालांचा उल्लेख केला आहे. कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या हे त्यातून सांगितले आहे. त्यात शिवसेना ४० आणि उद्धव ठाकरे गटाला २७ ठिकाणी विजय मिळाल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदेंनी केल्याचे दिसते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT