eknath shinde 
मुंबई/पुणे

हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे रुग्णालयात; दाेषींवर कारवाईचे आश्वासन

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : फेरीवाल्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात ठाणे महापालिकेच्या आेवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे kalpita pimpale या गंभीर जखमी झाल्या. त्यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे eknath shinde यांनी साेमवारी रात्री रुग्णालयात जाऊन चाैकशी केली. त्यानंतर त्यांनी अधिका-यांवर केले जाणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. हल्लेखाेरांना कडक शासन करु असे माध्यमांशी बाेलतना स्पष्ट केले.

साेमवारी सायंकाळी पिंपळे यांनी त्यांच्या प्रभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवार कारवाईचा बडगा उगारला. त्यावेळी फेरीवाल्यांपैकी अमरजीत यादव amarjeet yadav याने पिंपळे यांच्यावर हल्ला केला. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यात त्यांचा अंगरक्षक देखील जखमी झाला.

साेमवारी रात्री पिंपळेंना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन तब्येतीची चाैकशी केली. अंगरक्षकाची देखील विचारपूस केली. तसेच त्यांचा उपचाराचा सर्व खर्च महापालिका करेल असे सांगितले.

माध्यमांशी बाेलताना मंत्री शिंदे म्हणाले हा प्रकार निंदनीय आहे. महिला अधिका-यांवर हल्ला करणा-यांना कडक शासन केले जाईल. अधिका-यांवरील हल्ले खपवून घेणार नाही. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले आहे. दाेषींवर कडक कारवाई करा अशा सूचना पाेलिस अधिका-यांना दिल्याचे मंत्री शिंदे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT