Eknath shinde News  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde News : मला कारवाईचा बडगा उगारायला आवडणार नाही, पण...; एकनाथ शिंदे यांचा आमदारांना कडक इशारा

eknath shinde latest news : एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त आमदारांना कडक इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार चर्चेत आले आहेत. शिंदे गटाचे संजय देशमुख, संजय शिरसाट या आमदारांवर टीकेचा झोड उठली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त आमदारांना कडक इशारा दिला आहे. 'मला कुटुंबावर कारवाईचा बडगा उगारायला अजिबात आवडणार नसल्याचं म्हणत एकनाथ शिंदे यांनी इशारा दिलाय.

शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात, असा प्रश्न मला विचारतात. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर उर्जा वाया घालवू नका. कमी बोला जास्त काम करा. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं, असं सांगत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष इशाराही दिला.

'मला कुटुंबावर कारवाईचा बडगा उगारायला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करायला भाग पडणार नाही तसंच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसंच वागा.आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असंच समजून कामं करा, असे त्यांनी सांगितलं.

'कमी वेळात जास्त यश मिळालंय. लोकं आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plastic Stool: स्टूलमध्ये छोटे छिद्र का असते? डिझाईन समजण्याची करू नका चूक!

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

चिमुरडीच्या डोक्यात अडकलं भांडं, दीड इंचावर फिरत होता मृत्यू

Horoscope: आत्मविश्वास वाढेल मनातील भावना येतील ओठांवर; धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजच तुमचं भविष्य

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

SCROLL FOR NEXT