Eknath Shinde Announcement Revolutionary Chapekar Brothers Memorial in Pimpari Chinchwad Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde Announcement: क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार; CM शिंदेंची मोठी घोषणा

Pimpari Chinchwad News: : पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.

Satish Daud

Eknath Shinde Announcement: पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. (Latest Marathi News)

या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंग, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभूणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.

यावेळी प्रभूणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखरसिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

SCROLL FOR NEXT