Chandrakant Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Chandrakant Patil: पुणे विद्यापीठात अमली पदार्थ सापडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर? अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर नियमावली लागू

Education Minister Chandrakant Patil On Narcotics Found In Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मागील काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ सापडले होते. विद्यापीठात घडणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Rohini Gudaghe

गणेश कवडे, साम टीव्ही मुंबई

पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे अमली पदार्थ सापडले होते. त्यामुळे विद्यापीठात आणि शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती विधानपरिषदेत दिली.

चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय सांगितलं?

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आलीय. यासंदर्भात विशेष कार्यप्रणाली तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल ३ जूलै रोजी विधानपरिषदेत दिली आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे अंमली पदार्थ सापडल्याच्या घटना घडत असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून (Legislative Council) प्रश्न उपस्थित केला होता.  

विद्यापीठातच विद्यार्थ्यांकडे सापडले अमली पदार्थ

मे महिन्यात विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्याकडे अमली पदार्थ आढळले होते. त्यानंतर कारवाई देखील करण्यात आली होती. गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच या घटनेचा योग्य तपास करण्यासाठी तज्ञांची चार सदस्यीय समिती नेमण्यात आल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी (Chandrakant Patil) सांगितलं.

अनुचित घटनांवर आळा बसविण्यासाठी प्रयत्न सुरू

यापूर्वी विद्यापीठाच्या आवारात अशा प्रकारच्या घटना कधीही घडलेल्या नाही. यापुढे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी विद्यापीठ प्रशासन आवश्यक ती काळजी घेत (Narcotics) आहे. त्या दिशेने कार्यवाही सुरु असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. विद्यापीठ परिसरातच अमली पदार्थ सापडल्यामुळे पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

SCROLL FOR NEXT