TET Mhada Exam Scam Saam TV
मुंबई/पुणे

TET, आरोग्य आणि म्हाडा भरती घोटाळा प्रकरणात ईडीची एन्ट्री; ED च्या रडारवर कोण?

राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेला आरोग्यभरती, टीईटी आणि म्हाडा परीक्षेतील घोटाळा साम टीव्हीने उघडकीस आणला होता.

Jagdish Patil

प्राची कुलकर्णी -

पुणे : संपुर्ण राज्यभर गाजलेल्या आणि परिक्षा यंत्रणांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आरोग्यभरती, म्हाडा आणि टीईटी (TET) परीक्षा घोटाळा प्रकरणात आता एन्ट्री झाली असून या प्रकरणातील सर्व कागदपत्रे आता पुणे पोलिसांनी ईडीला दिली आहेत. (Health Recruitment, MHADA and TET Exam Scam Case)

ईडीने (ED) या परिक्षांच्या घोटाळा प्रकरणाची कागदपत्र पाठवावी अशी नोटीस पुणे पोलिसांना पाठवली होती. त्यानुसार आता पोलिसांनी ही कागदपत्रे ईडीला पाठवली आहेत. त्यामुळे ईडीच्या रडारवर नेमकं कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेला आरोग्यभरती, टीईटी आणि म्हाडा (MHADA) परीक्षेतील घोटाळा साम टीव्हीने उघडकीस आणला होता. तर या घोटाळ्यांमध्ये कोट्यावधींची उलाढाल झाल्याचे आरोप आहेत. त्याच पार्श्वभुमीवर आता ईडीने या प्रकरणाची दखल घेतली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच या प्रकरणात मनी लाँड्रिंग (Money laundering) झालं आहे का? हे देखील तपासलं जाण्याती शक्यता आहे.

राज्यभरात झालेल्या या परीक्षा घोटाळ्यांची चौकशी पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber ​​Police) सुरु असतानाच त्यांना ईडीकडून एक पत्र पाठविण्यात आलं होतं. या प्रकरणातील कागदपत्र ईडीकडे द्यावी अशी मागणी त्या पत्राद्वारे करण्यात आली होती.

त्यानुसार पुणे पोलिसांनी ही कागदपत्र ईडीला दिली आहेत. त्यामुळे या भरती घोटाळ्यातील ही महत्वाची घडामोड असून आता ईडीच्या रडारवर नेमकं कोण आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT