Nawab Malik Saam Tv
मुंबई/पुणे

Nawab Malik Arrest: मलिकांना ईडीकडून अटक, महाविकास आघाडीमधील 'या' नेत्यांमागे ईडीचं शुक्लकाष्ठ

यापूर्वीही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांमागे ईडीचे ससेमिरा लागला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केलीये. दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंगप्रकरणी नबाब मलिकांवा आज अटक करण्यात आली आहे. आज सकाळीच ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 8 तास ईडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे (ED Took Action Against These Leaders Of Mahavikas Aghadi Till Date).

यापूर्वीही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांमागे ईडीचे ससेमिरा लागला होता. त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 100 कोटी वसुली प्रकरणी अटक करण्यात आली होती. एकनाथ खडसे, भावना गवळी यांचीही ईडीवारी झाली आहे.

महाविकास आघाडीमधील 'या' नेत्यांच्या मागे ईडीचं शुक्लकाष्ठ -

अनिल परब, परिवहन मंत्री, शिवसेना

प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

भावना गवळी, खासदार, शिवसेना

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुनिल राऊत

नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री, राष्ट्रवादी

अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी

आनंदराव अडसूळ, माजी खासदार, शिवसेना

एकनाथ खडसे, राष्ट्रवादी

सकाळी ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी

नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ताब्यात घेतले होते. पहाटे 6 च्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांची 1 तास चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मलिकांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आणि तिथेही त्यांची तब्बल सात-आठ चौकशी केली. आता अधिक चौकशीसाठी नबाव मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

PM Modi : ६ दिवस, ५ देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Mumbai : मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बेकरी मालकाचं भयंकर कृत्य

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT