Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis |भारताची वाटचाल विश्व गुरू होण्याकडे सुरू : देवेंद्र फडणवीस

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Devendra Fadnavis News : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की, भारत हा विश्वगुरू होईल'. त्याची वाटचाल आता सुरू झाली आहे. नरेंद्र मोदी हे तरुण पिढीला समोर ठेवून बोलतात. आपण सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे, असे भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात विद्यार्थ्यांसमोर केले.

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव आणि 'घर घर तिरंगा' या उपक्रमांतर्गत युवा संकल्प अभियान शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' पुणे विद्यापीठाच्या वतीने दुसरा विक्रम गिनीज बुकात नोंद होत आहे. पहिला विक्रम केला तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून आलो. दुसरा विक्रम केला, तेव्हा मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो आहे'.

'विद्यापीठ हे केवळ शिक्षणामुळे ओळखले जात नाही. तर शिक्षणासोबत ज्ञान वाटप झालं पाहिजे. आपल्याला शिक्षणाकडून ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे. आम्ही ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला होता. त्यामुळे हरित पट्टा वाढला. त्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा वाटा होता'.

तरुण पिढीवर भाष्य करताना फडवणीस म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की, 'भारत हा विश्व गुरू होईल, त्याची वाटचाल आता सुरू झाली आहे'. हे तरुण पिढीला समोर ठेवून पंतप्रधान मोदी बोलतात. आपण सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. आमची युवा पिढी तिरंगा घेऊन सेल्फी घेऊन फोटो अपलोड करेल. याची नोंद गिनीज बुकात घेतली जाईल. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे'.

'तरुणाई ज्याच्या पाठिशी उभी राहते, ते सर्व यशस्वी होते. राष्ट्रभक्त समाज ज्या देशात असतो, तो देश पुढे जातो. त्यामुळे आपला देश पुढे जात आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. १०० व्या वर्षी आम्ही काय करणार यावर मोदी काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अजित पवारांचे कट्टर समर्थक मोहोळचे माजी आमदार राजन पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला

Maharashtra Politics : झालं 'कल्याण'! निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप-शिवसेनेत तणाव, अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा

Overcome Laziness: शरीरातील आळस दूर करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स करा फॅालो

Belapur Crime : पोलीस पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल; बचत गटाच्या नावाने पैसे घेत केली फसवणूक

अंतराळात दिसली रहस्यमयी वस्तू; शास्त्रज्ञंही झाले हैराण

SCROLL FOR NEXT