मुंबई/पुणे

Navi Mumbai Accident: दारुड्या डंपर चालकाचा भररस्त्यात राडा, खासगी वाहनांसह पोलिसांच्या कारला दिली धडक

Navi Mumbai Police: न्हावा शेवा पोलीसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

Priya More

Navi Mumbai News: दारुच्या नशेत डंपर चालकाने (drunken dumper driver) खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या (Navi Mumbai) उलवेमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील उलवे येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. डंपर चालकाचे आपल्या भावासोबत जारदार भांडण झाले. या भांडणामुळे त्रास होत असल्यामुळे सोसायटीतील रहिवासींनी पोलिसांना बोलावले. त्यामुळे संतप्त झालेल्या डंपर चालकाने सुरुवातीला सोसायटीच्या गेटवर डंपरने धडक दिली. त्यानंतर त्याने रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या गाड्यांना धडक दिली.

यावेळी डंपर चालकाने पोलिसांच्या गाडीला देखील धडक दिली. त्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात जात असताना या डंपर चालकाने पुन्हा वाहनांना धडक दिली. या डंपर चालकाला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी दोन राऊंड फायरिंग केली. डंपर चालकाच्या या राड्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर न्हावा शेवा पोलीसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेंबूर प्रकरणात सर्व अधिकारी निर्दोष; अधिकाऱ्यांना वाचवलं,कंत्राटदारांवर बिल फाडलं

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळली

Wednesday Horoscope : कामात प्रगती होणार; 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यक्तींना पैशाची चणचण जाणवणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana: मतांसाठी लाडकीत 3,500 कोटींचा अपहार; ठाकरेसेना कायदेशीर नोटीस पाठवणार

Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

SCROLL FOR NEXT