Dombivli Theft News Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli News : लक्ष्मीपूजना दिवशीच चोरट्यांनी मारला डल्ला; घरातले लोकं झोपताच साधला डाव

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला विशेष महत्व आहे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरामध्ये धनाची पूजा करत असतो.

प्रदीप भणगे

डोंबिवली : राज्यासह देशभरात दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Pujan) दिवसाला विशेष महत्व आहे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरामध्ये धनाची पूजा करत असतो. या दिवशी धनाची पूजा केल्याने घरात लक्ष्मी येते आणि श्रीमंती देखील वाढते अशी सर्वसामान्यांमध्ये धारणा आहे.

मात्र, लक्ष्मीपूजनानंतर रात्री घरातील माणसे गाढ झोपेत असताना चोरट्यांनी घरात शिरुन देव्हाऱ्यात पुजलेली रक्कम, सोनसाखळी, घड्याळ, गाडीची चावी असा ऐवज चोरुन घर साफ केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे.

एवढेच नव्हे तर चोरट्यांनी चोरी (Theft) करताना घरातील महिला आणि तिच्या मुलाला मारहाण करत ही जबरी चोरी केली असून लक्ष्मीपूजना नंतरच  रात्री घडलेल्या या चोरीच्या घटनेने डोंबिवलीत चोरट्यांनी दहशत वाढल्याचं दिसत आहे.

डोंबिवली पश्चिमेतील रिक्षाचालक संचित किर यांच्या घरी ही चोरी झाली असून तिघांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी संचित यांच्यावर धारदार हत्याराने वार करुन घरातील एकूण 41 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. सीसीटिव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

Political News : शिवसेना आमदाराच्या मुलाची रवानगी पोलीस कोठडीत; पाहा कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Fort : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला! ४,६०३ फूट उंचीवर दिमाखात उभे आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Ladki Bahin Yojana : गणेशोत्सवात लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट; 'या' दिवशी खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

SCROLL FOR NEXT