dombivli, ambulance, police, hawkers saam tv
मुंबई/पुणे

Dombivli News: मधुबन टॉकीज परिसरात राडा, Ambulance चालकास बेदम मारहाण; फेरीवाले पाेलिसांच्या ताब्यात

पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अभिजित देशमुख

Dombivli : डोंबिवली स्टेशन परिसरात (dombivli station) फेरीवाल्यांची (hawkers) दादागिरी पुन्हा समोर आली आहे. एका रुग्णवाहिकेच्या (ambulance) चालकास वाहन मागे घेत असताना फेरीवाल्यांच्या कडाप्पाला धक्का लागला. त्यामुळे संतापलेल्या फेरीवाल्यांनी चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. (Maharashtra News)

ही घटना डोंबिवलीतील मधुबन टॉकीज परिसरात घडली. ही घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत रुग्णवाहिका चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणा-या फेरीवाल्यांविरोधात रुग्णवाहिका चालकाने पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.

दाेन फेरीवाले पाेलिसांच्या ताब्यात

रुग्णवाहिका चालक गणेश माळी याच्या तक्रारीनंतर डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात दाेघांवर मारहाणाची गुन्हा दाखल करण्यात आला. गणेशच्या तक्रारीनूसार पाेलिसांनी अनिल गुप्ता व रोहित गुप्ता या फेरीवाल्यांना ताब्यात घेतलं.

कठाेर कारवाईची अपेक्षा

दरम्यान डोंबिवली स्टेशन परिसरात रस्ता व फुटपाथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नागरिकांकडून लोकप्रतिनिधींकडून या फेरीवाल्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या जातात. मात्र महापालिका प्रशासन तात्पुरती कारवाई करत असल्याने फेरीवाल्यांचे चांगलेच फावल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Headache Symptoms: अचानक तीव्र डोकेदुखी होत असेल तर, दुर्लक्षित करू नका; तरुणपणी होऊ शकतो 'हा' त्रास

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! महाराष्ट्र शासनाचा फलक, सायरन अन् आलिशान कार; कांद्याचा ट्रक लुटून चौघे पसार

Divya Shinde: पुण्यात बिग बॉस फेम दिव्या शिंदेला अटक, धक्कादायक कारण आले समोर

Silk Saree Designs: फॅन्सी आणि कम्फर्टेबल महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT