Dombivli MIDC Fire Blast Latest Update Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli MIDC Fire Update: डोंबिवली MIDC आगीत ६ जणांचा मृत्यू, ३४ जखमींवर उपचार सुरू

Dombivli MIDC Blast Latest Update in Marathi: डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत आतापर्यंत दोन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टिव्ही, कल्याण प्रतिनिधी

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत आतापर्यंत दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा हा ३४ वर पोहोचला आहे. त्यांच्यावर नजीकच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डोंबिवलीतील एमआयडीसी २ फेजमधील कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीला आगीनं वेढलं. संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. काही क्षणांतच आगीनं रौद्ररूप धारण केलं. आसपासच्या तीन ते चार कंपन्याही आपल्या कवेत घेतल्या. तर मागील बाजूस असलेल्या कारच्या शोरूममध्येही ही आग पसरली. यात मोठं नुकसान झालं आहे. मोठी वित्तहानी झाली आहे. तर जीवितहानीही झाली आहे. आतापर्यंत दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

आगीच्या घटनेनंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर सर्व यंत्रणांनी बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

दोन महिलांसह सहा मृतदेह आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ३४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अजूनही कंपनीत दोन ते तीन जण अडकल्याची माहिती मिळत आहे.

आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरलीय. बाजूच्या दोन ते तीन कंपन्याही जळून खाक झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. डोंबिवली एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी कार्यरत आहेत.

कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, पलावा एमआयडीसी आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील अग्निशमन केंद्रातून ही माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथे पोलिसांवर वाळू माफियांचा हल्ला

SCROLL FOR NEXT