Dombivli Crime News saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: बायकोकडे दारू पिण्यास पैसे मागितले, नकार देताच नवऱ्याने केले भयंकर कृत्य

Man Beating his wife: सागर चौधरी शनिवारी संध्याकाळी दारु पीवून घरी आला. पत्नी प्रतीक्षाकडे दारूसाठी पैसे मागू लागला.

Chandrakant Jagtap

>> अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Dombivli Crime News: डोंबिवली जवळील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई गावात एका दारुड्या पतीने पत्नी दारु पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली . पतीसह त्याच्या कुटुंबियांनी देखील मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली जवळील कल्याण शीळ फाटा रोड वरील काटई गावात प्रतीक्षा चौधरी व सागर चौधरी हे दाम्पत्य आपल्या कुटुंबास राहते. प्रतीक्षाचा पती सागर याला बैलगाडा शर्यती आणि दारुचे व्यसन जडले आहे. मिळणारा पगार तो बैलगाडा शर्यती आणि दारुवर घालवत होता.

सागर चौधरी शनिवारी संध्याकाळी दारु पीवून घरी आला. पत्नी प्रतीक्षाकडे दारूसाठी पैसे मागू लागला. पत्नीने त्यास नकार देताच त्याने तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर सासरच्या मंडळींनीही आपणास बेदम मारहाण केल्याचा आरोप प्रतिक्षाने तक्रारीत केला आहे. (Latest Breaking News)

या मारहाणीत प्रतीक्षा गंभीर जखमी झाले असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पती सागर सह पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT