Pedestrian crushed by speeding Vehicle saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Accident: घरी परतत असताना काळाचा घाला, भरधाव डंपरने पादचाऱ्याला चिरडलं

Pedestrian crushed by speeding Vehicle: रस्ते कामांसाठी माल घेऊन येणारे डम्पर चालक शहरातून भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याच्या तक्रारी आहेत.

Chandrakant Jagtap

Dombivli News: डोंबिवली पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर सायंकाळच्या सुमारास डंपरने दिलेल्या धडकेत एका 53 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. देवानंद रावल असे मृत व्यक्तीचे नाव असून ते डोंबिवली शिव मंदिर परिसरात राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी देवानंद रावल हे रस्त्यावरून शिवमंदिरकडे आपल्या घरी जात होते. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने रावल यांना जोरदार धडक दिली. या घटनेत रावल रोडवर पडले आणि त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेविषयी माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर घाबरलेला डंपर चालक घटनास्थळातून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. हा डंपर ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली आहे. (Dombivli News)

डोंबिवली शहरात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्ते कामांसाठी माल घेऊन येणारे डम्पर चालक शहरातून भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याच्या तक्रारी आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

Screen time effects on kids: वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिडेपणाची समस्या; कसं कराल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट?

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT