Governor Bhagat Singh Koshyari Vs Jayant Patil Saam TV
मुंबई/पुणे

महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का? जयंत पाटील यांचा सवाल

काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील (Jaynat Patil) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती केली आहे. तसंच महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपाल म्हणाले होते की, 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे.' त्यांच्या या वक्तव्यावरुन आता राज्याच्या राजकारणातील वातावरण ढवळून निघालं आहे. शिवाय राज्यपालांकडून सर्व स्तरांतून टीका होत आहे अशातचं आता जयंत पाटील यांनी देखील टीका केली आहे.

पाटील म्हणाले, 'घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे.

पाहा व्हिडीओ -

दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे. महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान माननीय राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का? राज्यपाल महोदय मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार अपमान का करत आहेत? असं ट्विट करत जयंत पाटील यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT