Maharashtra Political Crisis Eknath Shinde Vs Uddhav Thackeray News Saam TV
मुंबई/पुणे

व्हीप विरोधात मतदान केलेल्या आमदारांना अपात्र ठरवा; शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

पक्षादेश न पाळणाऱ्या ३९ बंडखोर आमदारांवर कारवाई करा - शिवसेना

अभिजित सोनावणे

मुंबई : शिवसेनेने जारी केलेल्या व्हीपनुसार मतदान न केलेल्या ३९ बंडखोर आमदार कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आली आहे. याबाबत आज नव्या विधानसभा अध्यक्षांकडे आपण याचिका दिली असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) यांनी आज दिली.

अरविंद सावंत म्हणाले, 'महाराष्ट्रात सध्या रात असवैंधनिक काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर जास्त आमदार असलेल्या पक्षाला निमंत्रण द्यायला पाहिजे होतं. मात्र, तसं झालं नाही. ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाची (Supreme Court) नोटीस त्यांनी शपथ घेतली. आम्ही व्हीप जारी केल्यानंतरही ३९ आमदारांनी व्हीप पाळला नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे पीटिशन दाखल केलं' असल्याचं सावंत म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

तसंच त्या ३९ आमदारांवर कारवाई केली पाहिजे, त्यांना अपात्र केलं पाहिजे अशी मागणी आपण विधानसभा अध्यक्षांच्याकडे केली आहे. उद्या सकाळी शिवसेनेचं कार्यालय उघडं होईल. आज रविवार म्हणून कार्यालय बंद असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलं.

तसंच शिवसेना हा रजिस्टर पक्ष असून या पक्षात पक्षप्रमुखांचेच आदेश चालतात, तुम्ही कोण? तुम्हाला मान्यता आहे का? असा सवालही त्यांनी शिंदे गटाला उद्देशून केला. तसंच भरत गोगावले यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे का असाही प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT