Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

मालमत्तेवरुन वडील मुलांमध्ये वाद; पोलिसांसमोरच मुलाने जाळून घेतले

मुंब्रा परिसरात अर्जुन चौरासिया यांचे दुकान आहे. या दुकानाच्या काब्जाबाबत अर्जुन चौरासिया आणि दोन मुले अशोक आणि मनोज यांच्यात वाद होता.

कल्पेश गोरडे

मुंबई : मुंब्रा पोलिस स्टेशनमोर असलेल्या दुकानाच्या मालमत्तेच्या वादातून बाप आणि मुलाच्या भांडणात लहान मुलगा मनोज चौरासिया याने स्वतःलाच पोलिसांसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. अत्यवस्थ मनोज चौरासिया याला मुंबईच्या KEM रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. हा आत्मदहनाचा संपूर्ण थरारक प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे.

मुंब्रा (Mumbra) परिसरात अर्जुन चौरासिया यांचे दुकान आहे. या दुकानाच्या काब्जाबाबत अर्जुन चौरासिया आणि दोन मुले अशोक आणि मनोज यांच्यात वाद होता. सदर प्रकरणी अर्जुन चौरासिया याने काही लोकांना हाताशी धरून दुकानाचा ताबा दुसऱ्याला दिला. सदरचा वाद हा सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश आंधळे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कायदेशीर कार्यवाही करून प्रकरण दिवाणी न्यायलयात पाठविले होते.

हे देखील पाहा -

सदरच्या प्रकरणी दिवाणी न्यायलयात प्रकरण सुरु असताना वडिल अर्जुन आणि लहान मुलगा मनोज यांच्यात पुन्हा दुकानावरुन वाद झाला असता मनोज याने सदर दुकानात घुसून पोलिसांसमोरच स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या आत्महत्येच्या प्रयत्नात मनोज हा जास्त भाजलै असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याच्यावर मुंबईच्या केइएम रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.

दुसरीकडे आत्मदहन प्रयत्न केल्यानंतर भाजलेल्या अवस्थेत मनोज हा रुग्णवाहिकेत बसून उपचारासाठी जाण्यास नकार दिला. मात्र जबरदस्तीने त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पिता-पुत्र यांचा वाद पूर्वीची झाला होता. असाच प्रयत्न करण्याचा प्रकार हा मनोजने केला होता. मात्र त्याला स्थानिकांनी आणि पोलिसांनी समजावले आणि प्रकरण हे न्यायलयात प्रविष्ट झाले. शनिवारी या वादाला पुन्हा उफाळून आला आणि हि दुर्दैवी घातना पोलिसांसमोरच घडली असून या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे पोलीस कशा प्रकारे कारवाई करतेय याकडे लक्ष लागले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT