Dilip Walse-Patil  SaamTV
मुंबई/पुणे

'त्या' कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करतील- गृहमंत्री...(पाहा व्हिडिओ)

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन केले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी (Minister Smriti Irani) अमित शाह यांच्या आयुष्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशनकरिता काल पुण्यात (Pune) आले होते. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन केले आहे. यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने- सामने आले होते, त्यातून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे राष्ट्रवादी नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण देखील करण्यात आली आहे. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा व्हिडिओ-

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, चूक कोणाची आहे, त्याप्रमाणे जर राष्ट्रवादीची चूक असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, आणि भाजपाची असेल तर त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत . भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही आक्षेपार्ह बाब आहे. यामुळे त्यांच्यावर जी कारवाई अभिप्रेत राहणार आहे ती कारवाई केली जाणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. एखाद्या लहान मोठ्या प्रश्नावरून मतभेद झाला तर लगेच त्याचा अर्थ महाविकास आघाडीत गडबड आहे, असे काढायचे काही कारण नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असणार आहेत. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला भाजपबरोबर लढायचं आहे. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्र काम केले पाहिजे. लढायचं आम्हाला भाजपच्या विरोधात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

SCROLL FOR NEXT