Mumbai Crime: धारावी हादरलं! दिवसाढवळ्या तरुणावर अंदाधुंद गोळीबार Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: धारावी हादरलं! दिवसाढवळ्या तरुणावर अंदाधुंद गोळीबार

मुंबईमध्ये गजबजलेल्या धारावीत भर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईमध्ये गजबजलेल्या धारावीत भर दिवसाढवळ्या गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. २ जणांनी एका तरुणावर अंदाधुंद गोळीबार (Firing) केला आहे. या हल्ल्यामध्ये (attack) तरुणाला ४ गोळ्या लागल्या असून तो गंभीररित्या जखमी झाला आहे. संबंधित तरुणावर मुंबई (Mumbai) मधील सायन रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. धारावी पोलीसांनी घटनेचा तपास करत हल्ला करणाऱ्या २ मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आमिर असून तो धारावी परिसरामधील रहिवासी आहे. (Dharavi Indiscriminate firing young man broad daylight)

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी तो बाथरूमकरिता पिला बंगलो परिसरालगत असणाऱ्या मोकळ्या मैदानात बाथरूमकरिता गेला होता. नैसर्गिक विधी उरकल्यावर तो परत आपल्या घराच्या दिशेने येताना त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या २ जणांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार होताच आमिर याने स्वत:चा जीव वाचवण्याकरिता टॅक्सीच्या दिशेने पळ काढला होता. पण आरोपींनी (accused) पाठलाग करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यामध्ये आमिरला ४ गोळ्या लागले आहेत.

घडलेल्या प्रकार जखमी तरुणाच्या एका मित्राने पाहिल्यावर त्याने आमिरला तातडीने सायन रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. हल्ला झालेला तरुण आणि आरोपी हे गुन्हेगारी प्रवृतीचे तरुण आहेत. ड्रग्स तस्करीच्या वादामधून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पण याला पोलिसांकडून (police) अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. धारावीमध्ये गोळीबार प्रकरणामध्ये ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये १ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे.

आरोपींकडून २ गावठी पिस्तुल, १ गावटी कट्टा, १५ काडतुसे, २ चॉपर, १ कोयता जप्त करण्यात आले आहे. १२ फेब्रुवारी दिवशी धारावीमध्ये झालेल्या टोळीयुध्दात गोळीबारात मृत्यू झालेला आमिर खान याला टोळीच्या वर्चस्वाकरिता सक्रिय होता. या टोळीने कट रचून आमिरची हत्या केली आहे. या गोळीबारात ८ वेळा गोळी झाडण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास धारावी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT