Dharavi Rada Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Dharavi News : धारावीत मोठा तणाव! संतप्त जमावाकडून महापालिकेच्या वाहनांची तोडफोड, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Dharavi Rada Latest News : मुंबईच्या धारावी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मशि‍दीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या वाहनांची जमावाने तोडफोड केली आहे.

Satish Daud

मुंबईच्या धारावी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मशि‍दीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या वाहनांची जमावाने तोडफोड केली आहे. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला आहे. सध्या परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरु असून जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी सकाळच्या सुमारास मुंबई महापालिकेचे पथक एका मशि‍दीचा अनाधिकृत भाग पाडण्यासाठी धारावी परिसरात गेले होते. यावेळी संतप्त जमावाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मुंबईच्या धारावी परिसरात मोठा तणाव

मात्र, कोणालाही न जुमानता या जमावाने थेट महापालिकेच्या वाहनांची तोडफोड केली. विशेष बाब म्हणजे, पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा पूर्णत: प्रयत्न केला. परंतु या जमावाने पोलिसांचे काहीही ऐकले नाही. दरम्यान, तणाव आणखीच वाढत असल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे.

तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या वरिष्ठ अधिकारी जमावासोबत चर्चा करीत आहेत. परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी मोठा फौजफाटा धारावीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. संतप्त जमावाने धारावी पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. जोपर्यंत महापालिकेचे पथक येथून परत जाणार नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

वर्षा गायकवाड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान, धारावीच्या या घटनेवर भाष्य करताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. धारावीच्या या मशि‍दीच्या संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यांना सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यावर लवकर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

धारावीच्या घटनेवरून नितेश राणेंचा इशारा

धारावीच्या घटनेवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धारावीत जिहादी मानसिकतेचे प्रदर्शन केलं गेलं आहे. अनधिकृत बांधकाम तोडायला दिलं नाही, त्यांच्या गाड्या फोडल्या. ही हिंमत त्यांनी पाकिस्तानात जाऊन हिंमत दाखवावी. अनधिकृत मंदिर तोडलं तर कुठलाही हिंदू असा बीएमसीच्या अंगावर जात नाही. आज जर हे अनधिकृत बांधकाम तोडलं नाही तर त्या मशिदीसमोर मंदिर बांधणार, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT