Devendra Fadnavis should Resign, Thackeray group Demand Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Andolan: देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, उद्या राज्यपालांची भेट घेऊन ठाकरे गट करणार मागणी

Thackeray Group On Devendra Fadnavis's Resign: देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, उद्या राज्यपालांची भेट घेऊन ठाकरे गट करणार मागणी

Satish Kengar

>> गिरीश कांबळे

Thackeray Group On Devendra Fadnavis:

एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार उद्या घेणार राज्यपालांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ते करणार आहेत.

आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचं शिष्टमंडळ उद्या दुपारी दोन वाजता घेणार राज्यपालांची भेट घेणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारनंतर राजकारण तापलं आहे. अशातच ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे. यातच उद्या राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे. (Political News)

दरम्यान, आज आज दुसऱ्यांदा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांनी उपोषण सोडावं, अशी विनंती केली. मात्र जरांगे पाटील यांनी सरकारला आपण उपोषणावर ठाम असल्याचं सांगत आरक्षण जाहीर करण्यासाठी आणखी चार दिवसांची मुदत दिली आहे. (Latest Marathi News)

यातच माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, ''सोमवारी उपसमितीची बैठक झाली. ही बैठक मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. पहिल्यांदा इतकी विस्तृत बैठक झाली. समितीचं काम ६०-७० टक्के झालंय. त्यांनी एक महिन्याचा अवधी मागितला. तीन महिन्यात अहवाल न आल्यामुळे मुख्यमंत्री खूप चिडले देखील. आता समितीने सांगितलंय की, आम्ही एक महिन्यात अहवाल देऊ.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळोद्यात 2 हजार चारशे रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

Deepika Padukone: आधी 'स्पिरिट' आता 'कल्की 2'; दीपिका पदुकोणची आणखी एका मोठ्या चित्रपटातून एक्झिट

Marutiच्या गाड्या लाखांनी स्वस्त होणार, S-Presso ते Wagon R कारच्या किंमतीत मोठी कपात, वाचा यादी

Shirdi Saibaba : साई प्रसादालयात आता साई आमटीचा प्रसाद; दर गुरुवारी भाविकांना मिळणार लाभ

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

SCROLL FOR NEXT