Devendra Fadnavis SaamTV
मुंबई/पुणे

Union Budget Reactions: आजचा अर्थसंकल्प म्हणजे भारताला आत्मनिर्भर आणि बलशाली बनविणारा- फडणवीस

आजच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक (मुंबई)

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळेल याची उत्सुकता सर्वसामान्य जनता, शेतकरी ते उद्योग विश्वाला अनेक दिवसांपासून लागून होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात 2047 पर्यंतची रुपरेषा असल्याचे सांगत 'पीएम गतिशक्ती योजने'च्या 'मास्टर प्लान'वर सरकार काम करत आहे असे सीतारामन यांनी सांगितले. तसेच गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसाठी येत्या काळात मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच आरबीआयचं डिजिटल चलन येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. पण देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी देखील पुढाकार घेऊन सहभाग घेणं आवश्यक असल्याचंही सीतारामण म्हणाल्या. तसेच शिक्षणासाठी देखील त्यांनी तरतुदी केल्या आहेत. एकूणच या अर्थसंकल्पावर विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Union Budget 2022 Reactions)

देवेंद्र फडणवीस म्हणाले,

"भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.

सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान मा. @narendramodi जी, @nsitharaman जी यांचे खूप खूप आभार!

#AatmanirbharBharatKaBudget"

या अर्थसंकल्पात महत्वाचे म्हणजे, गेल्या दोन वर्षात करोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण मागील सहा वर्षांपासून कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराश पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dolly Chaiwala: भाजपच्या प्रचारात डॉली चायवाल्याची झापूक- झुपूक एन्ट्री; Photos पाहा

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT