Badlapur School Crime Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Protest : बदलापूर घटनेची गंभीर दखल; आजच फास्ट ट्रॅक कोर्टात प्रस्ताव, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले? पाहा VIDEO

Devendra Fadnavis on Badlapur School Crime : बदलापुरातील आंदोलकांची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईची पुढची दिशा सांगितली आहे.

Vishal Gangurde

बदलापूर : बदलापुरातील नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर बदलापूरकरांचा रस्त्यावर आक्रोश पाहायला मिळाला. बदलापूरकरांनी मागील दोन तासांपासून रेल्वेसेवा रोखून ठेवली आहे. रेल्वे रुळावर उतरत आंदोलकांनी आरोपीला फाशीचा शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आंदोलकांकडून शहरातील पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा उड्डाणपूल देखील बंद करण्यात आला आहे. बदलापुरातील अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालणार आहे. या प्रकरणाचा प्रस्ताव आजच फास्ट ट्रॅक कोर्टात सादर करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बदलापुरातील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. संतप्त नागरिकांनी अत्याचार घडलेल्या शाळेची तोडफोड केली आहे. शाळेच्या प्रवेशद्वारातून आत शिरून जमावाने शाळेची तोडफोड केली आहे. मागील दोन तासांपासून आंदोलकांनी रेल्वे रोखून धरल्याने मध्य रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कल्याणकडून कर्जतकडे जाणारी रेल्वे ठप्प झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,'बदलापुरातील दुर्दैवी घटनेत २ तासांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यासाठी पोलिसांना सांगण्यात आलं आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. फास्टट्रॅक कोर्टात हा गुन्हा चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत'.

फास्टट्रॅक कोर्टात चालणार खटला : मुख्यमंत्री शिंदे

बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा फास्टट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'या घटनेनंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपीविरोधात कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवला पाहिजे. त्यामुळे कोणालाही यासारखं घाणरेडं कृत्य कोणी करणार नाही. या शाळेतील कर्मचारी असतील. त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी तपासून कामावर घेतले पाहिजे. या प्रकरणानंतर संस्था चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी कोणालाही सोडता येणार नाही. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार आहेत. या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोरोना काळात झालेल्या कामांची चौकशी होणार

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT