Devenbdra Fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

'याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'!'; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

राज्य सरकारच्या इंधनदरवाढ कमी करण्याचा निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने इंधनदरवाढी त्रासलेल्या राज्यातील जनतेला ठाकरे सरकारने दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपये ४४ पैशांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा २२ मे रोजी म्हणजे आजपासून हा निर्णय लागू होणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या इंधनदरवाढ कमी करण्याचा निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis ) प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्य सरकारने इंधन दर कपातीत किमान १० टक्के तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'!, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government ) टीका केली आहे. (Devendra Fadnavis has criticized Thackeray government )

केंद्र सरकारने पेट्रोल साडेनऊ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी कमी केले, या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपये ४४ पैशांनी कमी केले आहे. मात्र, ठाकरे सरकारच्या या निर्णयावर ट्विट करत भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के! इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'! अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने इंधन दरात केलेली कपात ही 'रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस' मध्ये केली आहे. हा सेस पूर्णपणे केंद्र सरकारचाच असतो. नोव्हेंबरमध्ये केलेली कपात सुद्धा याच सेसमध्ये होती. या दोन्ही कपात मिळून 2,20,000 कोटी रुपयांचा भार हा केंद्र सरकारने उचलला आहे. राज्यांना अबकारी करातील जो हिस्सा दिला जातो, त्यातून ही कपात नाही. त्यामुळे राज्यांचा हिस्सा अबाधित ठेवण्यात आला आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT