Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar Security : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका? पोलिसांनी वाढवली सुरक्षा, पाहा VIDEO

Ajit Pawar security increased : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा काढली आहे.

Satish Daud

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा काढली आहे. आज त्यांची यात्रा मालेगाव, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे.

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांची विशेष काळजी घेण्याचा सूचना गुप्त विभागाने दिल्या आहेत. यानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट झाले असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर अजित पवार सतर्क झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत या निकालाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अजित पवार यांनी महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा काढली आहे. त्यांच्या यात्रेची सुरुवात शिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.यात्रेदरम्यान अजित पवार यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती गुप्त विभागाने पोलिसांना (Police) दिली आहे. ही माहिती मिळताच महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून अजित पवार यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार फुटणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. शरद पवार गटाने 10 जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी 8 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. दुसरीकडे अजित पवार गटाला 5 पैकी केवळ एका जागेवरच विजय मिळवता आला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय वारं फिरलं असून अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे अजित पवार देखील सतर्क झाले असून त्यांनी आमदारांचा निधी रोखल्याची माहिती आहे. आपल्या गटातील आमदार शरद पवार यांच्या गटात गेल्यानंतर त्याला निधीचा फायदा होऊ नये म्हणून अजित पवारांनी ही रणनिती आखल्याचं कळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT