Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: डिलिव्हरी बॉयचं तरुणीपुढे अश्लील वर्तन, कोंढव्यातील घृणास्पद घटना

रात्री उशिरा ऑनलाईन सिगारेट ऑर्डर केल्याने एका तरुणीला एका वाईट अनुभवाला समोरं जावं लागलंय.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: रात्री उशिरा ऑनलाईन सिगारेट ऑर्डर केल्याने एका तरुणीला एका वाईट अनुभवाला समोरं जावं लागलंय. रात्री उशिरा सिगारेटची डिलिव्हरी घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीसमोर हस्तमैथुन केल्याचा घृणास्पद प्रकार घडलाय (Delivery boys obscene behavior in front of a young woman in Kondhva Pune).

पुण्यातील (Pune) कोंढवा येथील एका तरुणीबाबत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी जोगेंदर बिंद्रा (वय 40) या डिलिव्हरी बॉयवर (Delivery Boy) गुन्हा दाखल केला आहे.

रात्री उशिरा सिगारेटची ऑर्डर

कोंढव्यात राहणाऱ्या एका तरुणीने रात्री उशिरा डँजो अॅपद्वारे सिगारेटची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर देण्यासाठी डिलिव्हरी बॉय पहाटे पावणे तीन वाजता या तरुणीच्या घरी पोहचला. त्याने बेल वाजविली. तेव्हा या तरुणीने दरवाजा उघडला. तेव्हा या डिलिव्हरी बॉयने थेट तरुणीच्या समोरच हस्तमैथुन केलं. त्यानंतर या तरुणीने कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल केलीये. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT