dehu nagarpanchayat dhol tasha abhiyaan to collect house tax saam tv
मुंबई/पुणे

Dehu News : आयडियाची कल्पना... थकबाकीदारांच्या घरासमाेर ढोल वाजवून देहूत नगरपंचायतीची कर वसुली सुरु

देहू नगरपंचायतीने ढोल वाजवून थकीत मिळकत कर वसुलीसाठी केले आवाहन..

दिलीप कांबळे

Dehu Nagarpanchayat News :

पावणे अकरा कोटी रुपयांची थकीत रक्कम वसूल व्हावी यासाठी देहू नगरपंचायत प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. थकीत मिळकत कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढाेल पथकाच्या माध्यमातून ढोल (dhol) वाजवून थकीत रक्कम भरावी अशी आग्रहाची मागणी वसूली पथक मिळकतधारकांना करीत आहे. (Maharashtra News)

देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील मिळकत धारकांची सुमारे साडेतेरा कोटी रुपये मिळकतकर थकबाकी आहे. त्यापैकी पावणेतीन कोटी रुपयांची वसुली झाली आहे. अद्यापही जवळपास पावणे अकरा कोटी रुपयांची थकीत रक्कम वसूली व्हायची आहे.

थकबाकीदारांची मिळकत कर भरण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने वेळोवेळी दवंडी पेटवत सूचना नोटीस बजावून कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. दसरा दिवाळी सणामुळे करदात्यांना वेळही देण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अद्याप अनेक मिळकत धारकांनी थकीत कर भरला नाही. त्यामुळे थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन ढोल बडवून थकबाकीदारांकडून वसुली व्हावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता काटकर (chief officer nivedita katkar) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT