Rupali Patil Thombare Saam Tv
मुंबई/पुणे

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची सोशल मीडियावर बदनामी; 16 जणांवर गुन्हा दाखल

सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. यातच आता आजून भर पडली आहे. आता पुण्यातून आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या महिला नेत्याची सोशल मीडियावर (Social media) बदनामी करण्याविषयी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) यांच्या विरोधामध्ये अपशब्द आणि बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पाहा-

यामुळे आता परत एकदा राजकीय (Political) वातावरण तापणार असल्याचे संकेत दिसत आहेत. पुण्यातील (Pune) फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये १६ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम गुंजाळ यांनी ही तक्रार दाखल केली आहे. फेसबुकवर १ करोड ताईवर नाराज असणाऱ्याचा ग्रुपवर शिवीगाळ झाली होती. याविषयी सोशल मीडियावर महिला पदाधिकाऱ्यांची बदनामी केली जात आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि अश्लील भाषेत वक्तव्य केली जात होती. यामुळे याप्रकरणी सागर गजानन पाटील, प्रसाद राणे, ध्रुवराज ढकेडकर, राजेश दांडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड इतर ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस (Police) अधिकचा तपास करत आहेत.

या दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या त्यांच्या वक्तव्यामुळे खूपवेळा चर्चेत राहतात. अनेकवेळा त्यांनी मोठे वक्तव्यही केली आहे. राष्ट्रवादी विरोधात बोलणाऱ्या अनेकांवर त्यांनी जशास तसे उत्तर देखील दिली आहेत. आता या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून, यावर त्या कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT