Aditya Thackeray-Deepak Kesarkar Saam TV
मुंबई/पुणे

Aditya Thackeray News : आताची लहान मुलं काहीही बोलतात, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

Political News : अनेकांना हल्ली वाटू लागलयं आपण बोललो की आमचे दौरे रद्द होतं आहेत.

सूरज सावंत

Mumbai News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला जर्मनी आणि ब्रिटन दौरा अचानक रद्द केला.

यावरुन आदित्य ठाकरे यांनी 'डर अच्छा है' म्हणत दौरा रद्द झाल्याचं क्रेडिट घेतलं होतं. यावरुन मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

अनेकांना हल्ली वाटू लागलयं आपण बोललो की आमचे दौरे रद्द होतं आहेत. मात्र हे दौरे रद्द होण्यामागची कारणं वेगळी आहे. त्यामुळे कावळा बसायला आणि फांदी तुटायला, असं झालं आहे. आताची लहान मुलं काहीही बोलतात, त्यांना एनर्जी बार द्यायला लावू नका, अशी टीका दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

कुणीही मुख्यमंत्री बनू शकतं

राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, या अभिजीत पानसेच्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी म्हटलं की, लोकशाहीत मुख्यमंत्री कोणीही बनू शकतं. त्याबाबतची इच्छा मनात ठेवणं यात काही गैर नाही.

राज ठाकरे हेच मुळात बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत. मुख्यमंत्री बनण्याचा विचार राज ठाकरेंच्या मनात येणार नाही, तो इतरांच्या मनात येतो, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT