कोपर होम प्लॅटफॉर्मचे रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण... Saam Tv
मुंबई/पुणे

कोपर होम प्लॅटफॉर्मचे रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण...

कोपरच्या पश्चिमेला हा होम प्लॅटफॉर्म असून कोपर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकातील संभाव्य गर्दी लक्षात घेता लाखो प्रवाशांना दिलासा मिळाणार आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: कोपर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करून लाखो प्रवाशांना दिलासा दिला असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. मुंबईत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रेल्वेसेवा प्रकल्पांचे लोकपर्ण संपन्न झाले. (Dedication of Kopar Home Platform by Raosaheb Danve)

हे देखील पहा -

कोपरच्या पश्चिमेला हा होम प्लॅटफॉर्म असून त्याचा लोकार्पण सोहळा बुधवारी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. अशाच पद्धतीने आगामी काळात जिथे आवश्यकता असेल त्या सर्व ठिकाणी पादचारी पूल, एस्क्लेटर, होम प्लॅटफॉर्मस् आदी निर्णय झपाट्याने घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असल्याचे या प्रकल्पांवरून स्पष्ट होत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. तसेच अंबरनाथ स्थानकातील फलाट 280 मीटर लांबी आणि ८ मीटर लांब तर कोपर स्थानकातील 308 मीटर लांब ७.५ मीटर रुंद असे त्याचे स्वरूप आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT