Shivsena Symbol Dispute Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: धनुष्यबाणाचा फैसला सोमवारीच? ठाकरेंनी मागितला वेळ, शिंदे गटाकडून कागदपत्रे सादर

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे नक्की कोणाचे या संदर्भात आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर आपापली कागदपत्रं सादर केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे -

Shivsena Symbol Dispute: शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे नक्की कोणाचे या संदर्भात आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Eknath Shinde and Uddhav Thackeray) गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर आपापली कागदपत्रं सादर केली आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ठाकरे गटाच्या वतीने वकील देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगात कागदपत्र सादर केली आहेत. तर शिंदे गटाच्या वतीने वकील उत्सव त्रिवेदी यांनी कागदपत्र सादर केली. यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने १८० राष्ट्रीय कार्यकारणीच्या प्रतिनिधींची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, आज सादर केलेल्या कागदपत्रासंदर्भात निवडणूक आयोगानेlection Commission) दोन्ही गटाची सोमवारी सुनावणी घेणार असल्याची माहिती देखील खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे धनुष्यबाण संदर्भात दोन्ही गटाचं म्हणणं ऐकूण घेऊन सोमवारी पक्षाचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळतं आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची ठाकरे गटाने मागणी केली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर हक्काची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. (Andheri East Assembly by-election)

आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रांची तपासणी करून सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटात 40 आमदार, 12 खासदार आणि 1.5 लाख प्रतिनिधी असून या सर्वांचे प्रतिज्ञापत्र जोडलेले आहे. शिवसेनेवरील (Shivsena) आमचा दावा मान्य झाला पाहिजे अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटानेही आपल्या दाव्याची कागदपत्रे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांच्यामार्फत पाठवली असून सध्या 180 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची यादी जोडली आहे. अडीच लाख प्रतिनिधींची प्रतिज्ञापत्रे गोळा करण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतील त्यामुळे ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांचा अवधी मागितला आहे. तर शिंदे गटाने ७ लाख प्राथमिक सदस्यांची नावं सादर करण्यात आली आहेत तर याबाबातच प्रतिज्ञापत्र नंतर सादर करण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT