Thane News Saam TV
मुंबई/पुणे

Thane News: इमारतीचे बांधकाम सुरु असताना ढिगारा कोसळला, दोन कामगारांचा मृत्यू

ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

विलास काटे

ठाणे : ठाण्यातील नौपाडा परिसरातील बी केबिन येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु असताना ढिगारा कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. नौपाडा पोलीस देखील घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास सुरु आहे. (Thane News)

हबीब आणि रणजित अशी मृत कामागारांची नावे असून निर्मल कुमार गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नौपाडा बी केबिन येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सत्यनिलम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे.जेसीबीने खालची माती काढण्याचे काम सुरू असतानाच बाजूला असलेल्या मातीचा भला मोठा ढिगारा कोसळून त्याखाली 3 कामगार अडकले. (Latest News)

घटनेची माहिती मिळताच तात्काळ ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. काही वेळातच ढिगारा बाजूला केल्यावर त्याखाली अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर एक कामगार गंभीर जखमी आढळला, त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

SCROLL FOR NEXT