Abhijeet Bichukale Saam Tv
मुंबई/पुणे

Abhijeet Bichukale: पुणे सोडून जा अन्यथा खून करु; अभिजीत बिचुकलेंना जीवे मारण्याची धमकी; काय आहे प्रकरण?

पुणे सोडून न गेल्यास तुमचा खून करु अशी धमकी दिली जात आहे, असं बिचुकलेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Dnyaneshwar Choutmal

पुणे : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा, अशा धमक्या येत असल्याचा आरोप बिचुकले यांनी केला आहे. अभिजीत बिचुकले यांनी याबाबत थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. (Pune News)

पत्रात बिचुकले यांनी म्हटलं की, मी कसबा निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर मला विरोधकांकडून अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच मला पुणे सोडून जाण्यास सांगितलं जात आहे. तुम्ही पुणे सोडून न गेल्यास तुमचा खून करु अशी धमकी दिली जात आहे, असं बिचुकलेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

धमक्या येत असलेले फोन नंबर देखील बिचुकले यांनी पत्रात दिले आहेत. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण मिळावं, तसेच मला धमकी देणाऱ्यांना तत्काळ अटक करावी अशा मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT