खुन प्रकरण

 

Saam Tv

मुंबई/पुणे

पत्नी व मुलाच्या हत्येनंतर वडिलांची आत्महत्या; खानापूरात आढळला मृतदेह

आई व मुलाच्या खुन प्रकरणा मधील बेपत्ता झालेला वडील आबिद शेख याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : आई व मुलाच्या खुन प्रकरणा मधील बेपत्ता झालेला वडील आबिद शेख याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. खडकवासल Khadakwasla मधील खानापुर Khanapur गावाच्या हद्दित शेख याचा मृतदेह आढळला आहे. Deadbody of man found after killing wife and son

आबिद शेख याने फिरायला जाण्याच्या निमित्ताने आई व मुलाला बाहेर नेले होते. त्यानंतर दोघांचा खुन करुन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे मृतदेह टाकून दिले. त्यानंतर त्याने त्याच्या जवळील कार मार्केटयार्ड या ठिकाणी सोडली. यानंतर तो रिक्शाने नळस्टॉपला गेला. त्या ठिकाणाहून तो खानापुर येथे गेला. आई व मुलाच्या खुनाची घटना उघडकीस झाल्यानंतर तसेच याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच या खुनाबाबत संशय आबिदवर फिरत होता, यामुळे पोलिसांकडून त्याची कसून तपास सुरु होता.

पहा व्हिडिओ-

धानोरी मधील आलिया आबिद शेख (वय 35) व त्यांचा मुलगा आयान आबिद शेख (वय 6) यांचा खुन करून, आयानचा मृतदेह कात्रज मधील नवीन बोगद्याजवळ तर आलिया शेख यांचा मृतदेह सासवड- जेजुरी रस्तावर टाकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी, भारती विद्यापीठ व पुणे ग्रामीण पोलिसांच्या सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या घटनेपासून आयानचा वडील आबिद शेख हा बेपत्ता झाला होता. Deadbody of man found after killing wife and son

पोलिस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व भारती विद्यापीठ पोलिसांची ६ पथके आबिदचा शोध घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, सकाळी खानापुर या ठिकाणी आबिदचा मृतदेह सापडला आहे. पत्नी व मुलाचा खुन केल्यानंतर आबिदने आत्महत्या केली, असल्याची शक्यता पोलिसांनी Police व्यक्त केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT