Angadia Extortion Case Saam Tv
मुंबई/पुणे

Angadia Extortion Case: IPS सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल

अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याप्रकरणी एल.टी मार्ग पोलीस ठाण्यातील फारारी पोलीस निरीक्षक ओम वंगाटे या फरार आरोपीस काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

सुरज सावंत

मुंबई - अंगाडिया व्यवसायिक खंडणी प्रकरणात IPS सौरभ त्रिपाठी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याप्रकरणी एल.टी मार्ग पोलीस (Police) ठाण्यातील फारारी पोलीस निरीक्षक ओम वंगाटे या फरार आरोपीस काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. यापूर्वी याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली होती.

हे देखील पहा -

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाटी हे सुट्टीवर गेले होते. दरम्यान अटक आरोपी वंगाटे यांची कस्टडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले गेले, कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत 18 मार्च पर्यंत वाढ केली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) दिलीप सावंत यांनी स्वतः याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तावार्ता पथकाला(सीआययू) वर्ग करण्यात आला होता.

आंगडाई व्यावसायिकाना धाक दाखवून सौरभ त्रिपाठी यांच्या कडून खंडणी वसूल करण्याचे प्रकार सुरु होते. प्रकरण उजेडात आल्यानंतर त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. त्रिपाठी यांच्याविरुद्ध तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतरही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र वंगाटे यांच्या चौकशीतून त्रिपाठी यांनीच आगडिया व्यावसायिकाकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RSS: दसऱ्याच्या दिवशीच संघाच्या शाखेवर मोठी कारवाई; 39 स्वयंसेवक ताब्यात, काय आहे कारण, जाणून घ्या

Maharashtra Politics : ऐन दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा झटका; दोन बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray: न्याय हक्क मागणे देशद्रोह झालाय; वांगचूक यांच्या अटकेवरून उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

Minor Heart Attack: मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

Shivsena Dasra Melava: इस्त्री-व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही; लोकांसाठी संकटात धावणारा एकनाथ शिंदे|VIDEO

SCROLL FOR NEXT