..... म्हणून "माजी" म्हणू नका म्हणालो   अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

..... म्हणून "माजी" म्हणू नका म्हणालो

मला माजी मंत्री म्हणू नका याची क्लिप चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आली

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पुण्यात मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. मला माजी मंत्री म्हणू नका याची क्लिप चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आली आहे. माजी मंत्री म्हणू नका हे दुसऱ्या नेत्याकरिता होते असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच माझ्या वक्तव्याची राज्यभर चर्चा करण्यात आली. पण माझा असा कोणताही हेतू नव्हता.

तसेही एखाद्या वक्तव्याने फारसं नुकसान होत नसेल, तर बोला असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. सनसनाटी बातम्या निर्माण केल्यामुळे काही होत नाही. एकाही आमदाराला ते घेऊ शकत नाहीत. या राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे की पिंपरी चिंचवडचे हे समजतच नाही. ते कोरोना काळात राज्यात बाहेर कुठे गेले नाहीत.

हे देखील पहा-

पिंपरी चिंचवडची महापालिका माझ्या नेतृत्वाखाली होणार असे म्हणून त्यांनी स्वत:ला लहान केले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. फोडाफोडीच्या राजकारणाबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांनी जोरदार टीका केली की, कितीही माणसं पळवण्याचा प्रयत्न करा काही होणार नाही. तसेच लोकांचे नगरसेवकांवर प्रेम नाही मोदींवर प्रेम आहे. यामुळे जाणाऱ्यांनी विचार करावा.

तुम्हाला पुन्हा परतीची वाट नाही असा इशाराही देखील त्यांनी यावेळी दिला आहे. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावरून त्यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. पंजाबमध्ये काय झाले आहे ते पाहा. जहाज बुडते तेव्हा सर्वात शेवटी कॅप्टनने बाहेर पडायचे असते. आता पंजाबमध्ये कॅप्टनने राजीनामा दिला आहे. जहाज बुडाले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

जीएसटीवरून पवारांचा चेहरा उघड झाला आहे. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर नगदी पैसा पाहिजे आहे. त्याच्यावर राज्य चालवायचं आहे. तुम्ही का विरोध करता, लखनऊला का गेला नाहीत असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारलेला आहे. जयंत पाटील आणि फडणवीस यांनी शनिवारी एकाच गाडीतून प्रवास केल्याची चर्चा सध्या सुरु होती.

याबाबत विचारले असता राजकारण राजकारणाच्या जागेवर असते. शहादा सारख्या लहान गावात ते एकत्र गेले अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच आपल्याला कोणी राज्यपाल करतंय, कोणी केंद्रीय मंत्री करतंय, यामुळे मला खूप बरं वाटतंय अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT