DADAR STATION NAME CHANGE CONTROVERSY saam tv
मुंबई/पुणे

दादर रेल्वे स्टेशन नामांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट! रेल्वे स्टेशनचं नव्हे, तर कुठलं नाव 'चैत्यभूमी' होणार?

Dadar Station to Be Renamed Chaityabhoomi: दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून सुरु झालेल्या वादात आता नवा ट्विस्ट आलाय... खरचं दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे का? दादरच्या नामांतराचा प्रस्ताव नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मुंबईच्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून 'चैत्यभूमी' करणार असल्याची पोस्ट माहिती संचालनालयानं केली आणि सगळीकडे नामांतराची जोरदार चर्चा सुरू झाली. काहींनी समर्थन केले तर काहींनी सोशल मीडियावर आक्रमकपणे विरोध दर्शवला. त्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलणार असल्यानं मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडली. त्यामुळे काँग्रेसनं रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार की मेट्रो स्थानकाचं हे सांगा, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडे मागितलं.

दुसरीकडे दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार असल्याच कळताच मनसे या निर्णयाला विरोध करत मुख्यमंत्र्यांसह भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला...मनसेच्या यशवंत किल्लेदारांनी X पोस्टवर लिहलं... दादरचं नाव बदलताना दादरकरांचं मत विचारात घेतलं गेलं नाही. बाहेरच्या लोकांनी केलेल्या मागणीला दादरकरांवर थोपवत दादरकरांची ओळख पुसवण्याचं काम सुरु आहे.. तीव्र निषेध!

अखेर दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट आला...मुख्यमंत्री फडणवीसांनी दादर रेल्वे स्थानकाचं नव्हे तर दादर मेट्रो स्थानकाचं नावं चैत्यभूमी करणार असल्याची पोस्ट मुख्यमंत्री केली.

दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलयं..दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी हे नाव द्यावं अशी मागणी आंबेडकरी समाजाकडून अनेक वर्षांपासून केली जातेय...त्यात दादर मेट्रो स्थानकाऐवजी दादर रेल्वे स्थानकाचं नामांतराची होणार असल्याची पोस्ट डीजीआयपीआरनं केल्यामुळे गैरसमज वाढला. मात्र दादर रेल्वे स्टेशनचं नव्हे तर नव्या येऊ घातलेल्या मेट्रो स्टेशनचं नाव चैत्यभूमी करण्यात येणार असून आता याबाबत वाद निर्माण करण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Hemorrhage : वयाच्या 35 व्या वर्षी ब्रेन हॅमरेज! तरुणांनो, BP कडे दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली धोक्याची कारणे

चक्रीवादळाचा मार्ग बदलला; 14 राज्यांमध्ये कोसळणार धो-धो, 72 हजार नागरिकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी जाहीर

एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाही; सुप्रीम कोर्टात खळबळजनक सुनावणी| VIDEO

DIY Floor Cleaning Tool: वाकून फरशी पुसताना कंबर दुखतेय? मग वापरा हा २ मिनिटांत तयार होणारा मॉप, उभ्यानेच होईल सफाई

Panjab Election : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस धक्का, कंबोज यांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT