Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : हॉटेलमध्ये जास्त वेळ बसले म्हणून ग्राहकांना मारहाण, कात्रज परिसरातील धक्कादायक प्रकार

Pune Crime News : याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यात वाढत असलेली गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. पुण्याच्यातून रोजच गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतात. अशी एक घटना कात्रज परिसरातून समोर आली आहे. हॉटेलमध्ये जास्त वेळ बसल्यामुळे ग्राहकाला मारहाण झाल्याची प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. (Crime News)

हॉटेलमध्ये जास्त वेळ बसण्याच्या कारणावरून ग्राहकाला मारहाण केल्याची घटना कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी घडली. या प्रकरणी हॉटेलमधील तीन कामगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेलमधील कामगार धनंजय संजय भोसले (वय ३२), रफिक राजू अहमद (वय १९) आणि विशाल रमेश गुप्ता (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Latest News)

फिर्यादी आणि त्यांचा मावसभाऊ यांनी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर ते त्यांचा भाऊ वाट पाहत होते. आरोपींनी त्यांना हॉटेलमध्ये जास्त वेळ का बसलात, असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली.

एका कामगाराने फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. तर एकाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात बाटली फोडून जखमी केले. त्यावेळी फिर्यादीला वाचवण्यासाठी आलेल्या भावांनाही आरोपींनी मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; 251 सिलेंडर जप्त

केळी खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो का?

घायवळ गँगला मोठा हादरा; कुख्यात गुंड घायलवळच्या भावाला अटक, राजस्थानमधून मुसक्या आवळल्या

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT