ओमिक्रोन धोका; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू Saam Tv
मुंबई/पुणे

ओमिक्रोन धोका; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ११ आणि १२ डिसेंबर रोजी कलम १४४ लागू

Shivani Tichkule

मुंबई - देशात कोरोना विषाणूच्या ओमिक्रोन या व्हेरिएंटचे शुक्रवारी ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवे सातही रुग्ण परदेशाहुन परतलेले आहे. ओमिक्रोनच्या या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या कोरोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

काल (१० डिसेंबर) मुंबईमध्ये तीन आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रोनचे चार रुग्ण आढळून आले आहे. त्यात एका ३ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. एक रुग्ण धारावीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मुंबईमध्ये दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ११ आणि १२ डिसेंबर रोजी कलम १४४ लागू करण्यात आले. राज्यातील ओमीक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या १७ वर गेली आहे. ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT