पुणे - आज गटारी Gatari अमावस्या असल्याने आषाढ महिना संपत आहे. आज रविवार आणि गटारी अमावस्या जोडून येणं म्हणजे चिकन Chiken आणि मटण Mutton खवय्यांसाठी पर्वणीच. आज गटारी म्हणून सकाळपासूनच पुणेकरांनी Pune आखाड साजरा करायला मटण आणि चिकनच्या दुकानात गर्दी करायला सुरवात केली आहे. मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर पुणेकरांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच तोबा गर्दी केली होती.
आज सकाळपासूनच दुकानाबाहेर रांगा लावल्या आहेत. कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून सध्या पुण्यात विकेंड लॉकडाउन Weekend Lockdown लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील पहा -
मात्र, याकडे दुर्लक्ष करत गटारी अमावस्या असल्याने पुणेकरांनी चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली. पुण्यात सध्या चिकनचे दर हे २०० ते २२० रुपये तर मटण दर हे ७०० ते ७५० रुपये किलो रुपये किलो झाले आहे. पुण्यात करोनाचा संसर्ग सध्या कमी होत असतानाच अशा पद्धतीने नागरिकांनी गर्दी करणे म्हणजे प्रशासनाच्या नियोजनाला हरताळ फासण्याचा प्रकार असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.
दरम्यान असे असले तरी, काही ठिकाणी पुणेकरांनी आणि दुकानदारांनी कोरोना नियमांचे पालन केल्याचे देखील दिसून आले आहे. सोशल डिस्टन्स पाळून तर काही ठिकाणी गर्दी करून मात्र मास्क घालून पुणेकर बाहेर पडले.
मात्र सर्वांनी शिस्तीने रांगेत उभे राहून मटण घेतलं.श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने अनेक जण मांसाहार करत नाहीत त्यामुळे आज रविवार असल्याने मटण चिकनच्या दुकानाबाहेर पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. एक महिना मांसाहार करता येणार नसल्याने अनेकांनी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत मटणावर ताव मारण्याचा बेत आखला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.