Congress Leader's Saam TV
मुंबई/पुणे

तलवार पडली महागात; वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर गुन्हा (पहा Video)

भाजप नेते मोहित कंबोज याच्या तक्रारीवरून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य Congress नेत्यांवर वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज सावंत

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज याच्या तक्रारीवरून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांच्यासह इतरांविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवार काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एका जाहीर कार्यक्रमात मंत्री अस्लम शेख, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी हातात तलवार घेतल्या होत्या त्यांच्या या कार्यक्रमाचा फोटो मोहीत कंबोज यांनी ट्विट करत या मंत्र्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. आता कंबोज यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिस ठाण्यात काँग्रेस मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानंतर कंबोज (Mohit Kamboj) यांनी आरोप केले असता हा शीख समजाचा कार्यक्रम होता त्यांनी तलवार दिली, मोदी यांना पण तलवार दिली आहे. तलवार घेऊन आम्ही लोकांमध्ये नाचलो नाही. दोन्ही कार्यक्रमात फरक आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनेते अस्लम शेख यांनी त्यावेळी दिलं होतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT