Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : घरखर्चासाठी पैसे न दिल्याने पत्नीकडून पतीवर चाकूने वार, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune News : इम्रान खान (वय 46 वर्ष)असं जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : पत्नीने पतीवर हल्ला केल्याची धक्क्यादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. घरखर्चासाठी पैसे न दिल्याने पत्नीने पतीवर चाकूने वार केले. कोंढवा परिसरात शिवनेरीनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune News)

इम्रान खान (वय 46 वर्ष)असं जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी इम्रानची पत्नी नाझनीनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रानचे वडील उस्मान यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Crime News)

रमजान महिना सुरू असल्याने नाझनीनने इम्रानला घरखर्चास पैसे मागितले होते. इम्रानने पैसे देण्यास नकार दिल्याने नाझनीन आणि इम्रान यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात नाझनीने स्वयंपाकघरातील चाकुने इम्रानवर वार केले. जखमी इम्रानवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Maharashtra News Live Update : पुण्यात 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दिला चोपलं

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8 व्या वेतन आयोगामुळे HRA मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता; कसे असेल कॅल्क्युलेशन?

Maharashtra Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खरंच फूट पडली का? सुनील तटकरेंनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण

Mumbai : विरारमध्ये भयंकर घडलं, अर्नाळा समुद्रात ४ मुलं वाहून गेली

SCROLL FOR NEXT