Virar Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Virar Crime News: पेट्रोल बॅाम्ब हल्ला प्रकरणात आणखी एकाला अटक; विरार पोलिसांची मोठी कामगिरी

विरार पोलिसांनी त्याला शुक्रवारी संध्याकाळी अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन इंगळे

Mumbai Crime News: विरार येथे राहणारे आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घरावरील पेट्रोल बॅाम्ब हल्ला प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात विरार पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपी हा कुख्यात गुंड व गोल्डन गॅंगचा मोरक्या चंद्रकांत खोपडे याचा मुलगा शैलेंद्र खोपडे असल्याची माहिती विरार पोलिसांनी दिली आहे. विरार पोलिसांनी त्याला शुक्रवारी संध्याकाळी अटक केली आहे.(Latest Virar News)

विरारचे आयर्नमॅन या किताबाचे मानकरी हार्दिक पाटीलच्या घरावर ४ मे रोजी काही अज्ञात इसमांकडून पेट्रोलचा बाँम्बचा हल्ला करण्यात आला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न, कट कारस्थान रचणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्यापही फरार होते. यातील आरोपी शैलेंद्र खोपडे हा मुंबईत असल्याची माहिता पोलिसांना मिळाली असता त्यांनी सापळा रचून त्याला मुंबईच्या भोईवाडा परिसरातून अटक केली.

विरार पोलिसांनी माहिती दिली की, शैलेंद्र याच्यावर मुंबईत काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. शैलेंद्रने व्हॉट्अ‍ॅप कॉलवरून हार्दिक पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. शनिवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी साम टिव्हीला दिली.

नेमकी काय होती घटना?

विरार येथील वर्तक वार्डच्या स्वागत बंगलो येथे ४ मेच्या रात्री पावणे बाराच्या दरम्यान हा हल्ला झालेला आहे. हिरव्या रंगाच्या एका दुचाकीवरुन येत जाणिवपूर्वक पेट्रोल भरलेल्या काचेच्या बॉटलमधील कोंबलेल्या कपड्याला आग लावुन ती पेटती बॉटल हार्दिक पाटील यांच्या राहत्या बंगल्यामधील गेटच्या आतील भागात फेकून हा हल्ला करण्यात आलेला होता. ही घटना सीसीटीव्ही कैद झाल्याने सर्व प्रकार उघडकीस आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला सदस्यावर जीवघेणा हल्ला

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT