Lonavala Gramin Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

दारूच्या नशेत मुलानेच केला बापाचा खून; मावळ तालुक्यातील घटना...

पोलिसांनी आरोपी मुलाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.

दिलीप कांबळे

मावळ - दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना मावळ (Maval) तालुक्यातील जवण येथे घडली. घरातून दुर्गंधीयुक्त वास आल्याने नागरिकांनी लोणावळा (lonavala) ग्रामीण पोलीस (Police) ठाण्याला माहिती दिल्याने ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान आरोपीने खून करून पलायन केले होते. पोलिसांनी आरोपी मुलाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.

हे देखील पाहा -

खंडु गिरंजे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जवण पवनानगर परिसरातील रहिवासी होते.तर शेखर गिरंजे असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ सखाराम गिरंजे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत खंडु गिरंजे व शेखर खंडु गिरंजे यांच्यामध्ये दारूच्या नशेत वाद झाला आणि तो वाद इतका विकोपाला गेला की, मुलगा शेखर याने आपले वडील खंडु गिरंजे यांचा गळा दाबून खून केला.

आरोपी ताब्यात

त्यानंतर मुलगा तेथून पळून गेला होता. मात्र मोठ्या शिताफीने लोणावळा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीला गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT