पुण्यातील बड्या व्यावसायिकांवर गुन्हा; ३० कोटींच्या खंडणीचा आरोप Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील बड्या व्यावसायिकांवर गुन्हा; ३० कोटींच्या खंडणीचा आरोप

सीआयडी ऑफिस संगम पूल येथे खंडणी विभागात गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - पुण्यातील Pune वेनिसा डिसूजा व अली जाफरी या बांधकाम व्यावसायिकांवर खंडणी मागितल्याचा आरोप करत हेमंत मोटाडू यांनी डिसूजा व जाफरी यांच्या विरुद्ध सीआयडी ऑफिस संगम पूल येथे खंडणी विभागात एफआयआर FIR दाखल केली आहे. १ कोटी ३६ लाख मोबदला देवून हेमंत मोटाडू यांनी सर्वे नं ११८ च होली बुद्रुक येथे ५ हेक्टर ३५ आर व्ही जमीन २० मार्च २०१३ रोजी हिरानंदाणी प्रॉपर्टी प्रा.लि. मुंबई यांच्याकडून रितसर रजिस्टर्ड खरेदी खत करून घेतली होती. खरेदी खत झाल्यानंतर त्यांना माहीत पडले की आपल्याला विकली गेलेली जमीन अली जाफरी यांनी हिरानंदाणीला २००५ मध्ये हस्तांतर केली होती.

हे देखील पहा -

या सर्व प्रकारांमध्ये संपूर्ण मोबदला घेवून अली जाफरी यांनी एकदा विकलेली जमीन पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी बाई वेनिसा डिसूजा यांना फसवणूक करून चतुराईने १८/१०/२०१२ रोजी खरेदी खत करून दिले होते. ही फसवणूक केल्यानंतर पैशाची भूक भागत नसल्याने २०/१२/२०२० रोजी अली जाफरी यांनी हेमंत मोटाडू यांना कोहिनूर हॉटेल,एमजी रोड,येथे बोलावून मला ३० कोट रुपये दे मग मी तुला या जमिनीची एनओसी देतो, अन्यथा मी तुझे नुकसान करीन अशी धमकी दिली.

याच आधारे हेमंत मोटाडू यांनी अली जाफरी राहणार ८ नेपियन रोड, पुणे कॅम्प व वेनिसा डिसूजा, यांच्या विरुद्ध सीआयडी ऑफिस संगम पूल येथे खंडणी विभागात एफआयआर दाखल केली आहे जाफरी आणि डिसुझा फरार आहेत खंडणी पथक त्यांचा शोध घेत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT