Cow in Drainage Saam Tv
मुंबई/पुणे

ड्रेनेजच्या टाकीत पडली गाय; बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

गायीला इजा होऊ न देण्याचा प्रयत्न जवान करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, सुरज सावंत

मुंबई - ड्रेनेजच्या टाकीत गाय अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कबुतर खाना परिसरात घडली आहे. आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ड्रेनेमध्ये अडकलेल्या गायीला (Cow) बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. ड्रेनेज (Drainage) टाकीच्या झाकणावर गाय उभी असताना, झाकण सरकून गाय ड्रेनेमध्ये पडल्याची माहिती समोर आली आहे. गंगू नामदेव शिंदे असे या गायीच्या मालकीणचे नाव आहे.

हे देखील पहा -

सध्या मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी गायीला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी बीएमसीचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत. गायीला सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, दादर भागात असलेल्या भवानी शंकर रोडवरील कबुतर खाना परिसरात सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. गाय ड्रेनेज टाकीच्या झाकणावर उभी होती. यावेळी अचानक झाकण सरकलं आणि गाय ड्रेनेज पडली. अशी माहिती तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दिली आहे. सध्या या गायीला सुखरुपरित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आजूबाजूचा भाग खोदून तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गायीला इजा होऊ न देण्याचा प्रयत्न जवान करत आहेत. गाय टाकीत पडल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : लष्करात शोककळा! भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT